OpenShift CLI (oc) and Web Console
1. OpenShift CLI (oc) — कमांड लाइन इंटरफेस
OpenShift CLI (oc) म्हणजे कमांड लाइन इंटरफेस ज्याचा वापर OpenShift क्लस्टरशी संवाद साधण्यासाठी होतो याला oc असे म्हणतात.
किवा oc म्हणजे OpenShift चं command-line tool. हे आपण टर्मिनल किंवा कमांड प्रॉम्प्टवरून वापरतो.
वैशिष्ट्ये:
- क्लस्टरशी थेट संवाद साधतो (login, logout) किवा क्लस्टरमध्ये लॉगिन करणे
- प्रोजेक्ट तयार करता येतो (oc new-project) किवा प्रोजेक्टस, पोड्स, डेप्लोयमेंट्स इ. तयार करणे, पाहणे किवा हटवणे
- Pods, Deployments, Routes इत्यादी व्यवस्थापित करता येतात
- YAML फाईल्स वापरून configuration apply करता येतो किवा yaml फाइलच्या आधारे aaps deploy करणे
- स्क्रिप्टिंगद्वारे automation करता येतो
- Logs बघणे , troubleshooting करणे
उदाहरण:
oc login https://mycluster:6443
oc new-project myapp
oc get pods
oc apply -f app-deployment.yaml
मराठीत समजावून:
- oc CLI वापरून आपण OpenShift मध्ये सर्व तांत्रिक गोष्टी जलदगतीने करू शकतो.
- DevOps, Developers आणि Admin यांच्यासाठी CLI खूप उपयुक्त आहे.
• 2. OpenShift Web Console — वेब आधारित GUI
- OpenShift ची Web Console म्हणजे एक सुंदर, वापरायला सोपी वेबसाईट जिथून आपण OpenShift क्लस्टरचं व्यवस्थापन करू शकतो. किवा OpenShift web Console हे web आधारित GUI (graphical user interface) आहे यामधून तुम्ही browser मधूनच OpenShift क्लस्टरचे व्यवस्थापन करू शकता.
वैशिष्ट्ये:
- GUI आधारित इंटरफेस – क्लिक करून काम करता येतं
- लॉग्स, ग्राफ्स, CPU/Memory वापर पाहता येतो
- YAML एडिटिंग करता येते
- Developers साठी “Developer View” आणि Admins साठी “Administrator View”
- बॅकअप, हेल्थ स्टेटस, इत्यादी गोष्टींची माहिती सहजपणे मिळते
मराठीत समजावून:
- Web Console ही नॉन-टेक्निकल युजर्स किंवा visual इंटरफेस हवे असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.
- यामध्ये आपण GUI वापरून Pods तयार करू शकतो, सर्व्हिसेस पाहू शकतो, आणि अॅप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो.
CLI आणि Web Console मध्ये तुलना:
वैशिष्ट्य | oc CLI | Web Console |
वापर | टेक्निकल, कमांड्स आधारित | GUI आधारित, सुलभ |
वेग | जलद आणि स्क्रिप्टिंगसाठी उपयुक्त | इंटरएक्टिव्ह आणि व्हिज्युअल |
कोडिंग गरज | हो (थोडी) | नाही |
YAML Support | पूर्ण | GUI मध्ये YAML एडिट करता येतो |
Learning Curve | थोडी जास्त | सोपी सुरुवात |
कोणते वापरावे?
- जर तुम्ही Developer/DevOps Engineer असाल तर oc CLI उपयुक्त.
- जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल किंवा GUI पसंत करत असाल, तर Web Console उपयुक्त.
- दोन्ही एकत्र वापरल्यास सर्वात चांगला अनुभव.
