Master & Node

OpenShift Master आणि Node या दोन महत्वाच्या घटकाची भूमिका वेगवेगळी आणि महत्वाची असते. याबद्दल याचे मध्ये खाली स्पष्टीकरण दिले आहे.

Master (Master Node)

Master node हा संपूर्ण OpenShift cluster नियंत्रण केंद्र (control plane) असतो. यावर क्लस्टर व्यवस्थापनाचे मुख्य घटक चालतात.

मुख्य जबाबदार्‍या :

  • क्लस्टरमध्ये कोणते pods कुठे चालवायचे हे ठरवतो (scheduling)
  • वापरकर्त्याचे आदेश (Requests) स्वीकारतो आणि प्रक्रिया करतो (API Server)
  • Cluster ची स्थिति पाहतो व update ठेवतो (Controller Manager)
  • Database म्हणून etcd वापरतो – cluster configurations यामध्ये store राहते.

Master Node वर चालणार्‍या मुख्य सेवा

  • API Server
  • Controller Manager
  • Scheduler
  • etcd

Node (Worker Node)

Node म्हणजे OpenShift मध्ये असे यंत्र (Server/VM) ज्यावर प्रत्यक्षात कंटेनर चालवले जातात.

मुख्य जबाबदार्‍या:

  • Master कडून मिळालेले आदेश पाळतो.
  • Pods चालवतो आणि त्याची स्थिति Master ला कळवतो.
  • Container runtime वापरुन कंटेनर चालवतो. (जसे की CRI-O किवा Docker)

Node वर चालणार्‍या मुख्य सेवा:

  • Kubelet – Master शी सवाद साधते आणि pods नियंत्रित करते.
  • Kube–proxy – नेटवर्किंग सुलभ करते.
  • Container Runtime – कंटेनर चालवतो.

सरळ तुलना:

घटक

Master

Node

भूमिका

नियंत्रण केंद्र

काम करणारा यंत्र

काय चालते

Scheduling, API, etcd

Pods, container

उदाहरण

Traffic control center

Truck/Driver