ETCD

ETCD हे OpenShift मधील एक महत्वाच घटक (Component) आहे. जे संपूर्ण cluster configuration आणि स्थिति (state) साठवते. खाली याबद्दल माहिती दिली आहे.

ETCD म्हणजे काय?

ETCD हे एक key-Value store आहे जे OpenShift किवा kubernetes क्लस्टरमधील सर्व data साठविण्यासाठी वापरले जाते. यामध्ये क्लस्टरची स्थिति, node माहिती, pods services, secrets, configmaps आणि बरेच काही ठेवले जाते.

ETCD चे कार्य काय आहे?

  • क्लस्टर स्टेट साठवतो – संपूर्ण OpenShift क्लस्टरमधील चालू माहिती ETCD मध्ये असते.
  • API सर्वरसाठी बॅकएंड – जेव्हा तुम्ही oc किवा kubectl ने एखादी गोष्ट create/update करतो, तेव्हा ती माहिती शेवटी ETCD मध्ये साठवली जाते.
  • High availability साठी क्लस्टर असतो – उत्पादनात (production environment) ETCD अनेक nodes वर चालवला जातो जेणेकरून data सुरक्षित आणि उपलब्ध राहील

 

ETCD ची रचना (Architecture)

  • Key-value store – data key-value pair मध्ये ठेवला जातो.
  • Raft Consensus Algorithm – Cluster मधील consistency राखण्यासाठी हा algorithm वापरला जातो.
  • Multiple nodes – साधारणत: ३ किवा ५ ETCD nodes असतात जे redundancy आणि fault-tolerance देतात

ETCD मध्ये काय साठवल जात?

  • Nodes ची माहिती
  • Pods आणि त्याची स्थिति
  • ConfigMaps आणि secrets
  • Role-based access control (RBAC)
  • Events, Deployments etc.

ETCD बॅकअप व पूर्णसंचय (Backup & Restore)

OpenShift मध्ये etcdcdl किवा oc adm वापरुन तुम्ही ETCD चा backup घेऊ शकता हे production मध्ये अत्यंत महत्वाचे असते कारण ETCD बिघडल्यास संपूर्ण cluster प्रभावित होतो.

उदा: bash

Oc adm etcd backup –dest-dir=/backup

 

निष्कर्ष: ETCD हे OpenShift मधील मेंदुसारखे काम करते त्याशिवाय cluster चालू शक्त नाही त्यामुडे त्याच योग्य backup, सुरक्षा आणि monitoring करणं खूप गरजेचं आहे.