Container orchestration
container orchestration म्हणजे काय?
container orchestration म्हणजे अनेक containers च स्वयचलित व्यवस्थापन करणे.यामध्ये container तयार करणे, तैनात (deploy) करणे, scale करणे, networking आणि त्यांचे आरोग्य तपासणे या गोष्टीचा समावेश होतो.
container म्हणजे काय?
container हा एक हलका, portable आणि स्वतंत्र एकक (युनिट)असतो, जे की कोणत्याही application आणि त्यांचे सर्व अवलंबन (dependencies) एका जागी एकत्र ठेवतो. docker हे एक प्रसिद्ध container platform आहे.
container orchestration कशासाठी वापरतात?
१)स्वयंचलित डिप्लॉयमेंट (Automatic deployment)
२) स्कॅलबिलिटी (scalability) – गरजेनुसार containers वाढवणे किंवा कमी करणे.
३) लोड बॅलन्सिन्ग (load balancing)
४) फेलओव्हर आणि रिकव्हरी (failover & Recovery)
५) मॉनिटरिंग आणि लॉगिंग ( Monitoring & Logging)
लोकप्रिय कंटेनर orchestration tools:
१)kubernetes – सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली कंटेनर orchestration tool
२) docker swarm – docker च सोप आणि लवचिक orchestration
३)Apache Mesos – मोठ्या प्रमाणावर scalable orchestration साठी वापरले जाते.
ex:
तुमच्याकडे एक web applications आहे जे 3 कंटेनर्समध्ये चालते.
१)एक Frontend
२) एक Backend API
३) एक Database
जर हे सर्व कंटेनर्स kubernetes वापरून व्यवस्थापित केले तर:
१) हे आपोआप योग्य नोडवर चालतील
२) जर कुठलाही कंटेनर बंद झाला तर तो पुन्हा सुरु होईल.
३) scalable ट्रॅफिकसाठी नवीन कंटेनर तैनात होतील.
